रामटेक येथे आयोजित तीन दिवसीय रामटेक संस्कृतिक महोत्सवनिमित्त रामटेक शहरातील विविध ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. रवि. दि. 1 फेब्रुवारीला सकाळी 9 ते सायं. 5.30 वा पर्यंत विविध स्पर्धेत खेळाडू, युवक, युवती, महिलांनी उत्साहात सहभाग नोंदविला. विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. तर चेरी फार्म खिंडसी बॅक वॉटर रामटेक परिसरात हॉट एअर बलून, एयरो मॉडेलिंग सारखे साहसी खेळ घेण्यात आले.