शहादा: जयनगर गावात वृक्षारोपण करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे आज सकाळी जयनगर या गावात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करत शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तहसीलदार दीपक गिरासे नाप तहसीलदार शैलेंद्र गवते सरपंच ईश्वर माळी उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.