23 जानेवारीला सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत येणाऱ्या फेटरी गावात एका 'ओयो' हॉटेलमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २१ वर्षीय रुचिका भांगे या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याने खळबळ माजली आहे. गुरुवारी दुपारी सौरभ जामगडे आणि रुचिका यांनी हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली होती. सीसीटीव्ही फुटेज नुसार, हॉटेलमध्ये आल्यानंतर अवघ्या तासाभरात सौरभ मागील भिंतीवरून उडी मारून पसार झाला.