मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. प्राची थोरात यांनी आज प्रचारादरम्यान चाळीसबंगला रोड परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मतदारांनी त्यांना केवळ पाठिंबाच दिला नाही, तर त्यांच्या उमेदवारीबद्दल अत्यंत सकारात्मक आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.