रामटेक: म. रा. शेतमजूर युनियन लाल बावटाचे तिसरे नागपूर जिल्हा अधिवेशन गंगाभवनम रामटेक येथे संपन्न
Ramtek, Nagpur | Sep 17, 2025 संविधानाचे रक्षण करण्यासाठी शेतमजुरांना एकजूट करा असे आवाहन करीत बुधवार दि. 17 सप्टेंबरला स. 11 वाजता पासून गंगाभवनम,आंबेडकर चौक रामटेक येथे म.रा. शेतमजूर युनियन लाल बावटाचे तिसरे नागपूर जिल्हा अधिवेशन गंगाभवनम रामटेक येथे संपन्न झाले. रामटेक शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा, जनसुरक्षाविरोधी कायदा रद्द करा. शेतमजुरांना 10 हजार रुपये किमान वेतन द्या, शेतमजुरांना घराचे पट्टे, जमिनीचे पट्टे वाटप करा इत्यादी घोषणा देण्यात आल्या.