शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने आज (दि. ३१) सकाळी ७ वाजता 'रन फॉर युनिटी' अंतर्गत राष्ट्रीय एकता दौड चे भव्य आयोजन करण्यात आले. लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या दौडीस स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.