सोलापुर धुळे मार्गावरील गल्लेबोरगावजवळ धावत्या बसमधून प्रवासी महिलेने घेतली उडी, चाकाखाली येवून जागीच मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 30, 2025
खुलताबाद तालुक्यातील सोलापुर धुळे महामार्गावर गल्लेबोरगावजवळ धावत्या बसमधून एका महिला प्रवासीने उडी घेतली. बसच्या मागील चाकाखाली येऊन महिलोचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. 29 ऑक्टोबर रोजी घडली. कांताबाई योगेश मरमट वय 40 रा. देहाडे नगर, हर्सूल सांवगी ता. छत्रपती संभाजीनगर असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती दि. 30 ऑक्टोबर रोजी मिळाली आहे.