लोहा: परंपरेचा वारसा जपणारा माळेगावचा घोडेबाजार; अश्वप्रेमींची अलोट गर्दी
Loha, Nanded | Dec 19, 2025 दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबा यात्रेला अनेक वैशिष्ट्यांची परंपरा लाभलेली आहे.देवदर्शनासोबतच घोड्याचे माळेगाव म्हणून ओळख मिळवून देणारा येथील भव्य घोडेबाजार हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरते.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रेत देशभरातून विविध जातींचे घोडे दाखल झाले असून घोडेबाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.राजस्थान.गुजरात.कर्नाटक.पंजाब.सारंखेडा मंडीसह महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच उत्तरप्रदेश. मध्यप्रदेश. बिहार.उत्तराखंड येथून घोडे व्यापारी