आज दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 1 हजार 234 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत, तर 26 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवून फेटाळण्यात आली आहेत. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 1 हजार 260 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती. छाननी प्रक्रियेनंतर 26 अर्ज बाद झाले असून 1 हजार 234 अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत.