राहाता: गोरक्षक मारहाण प्रकरण अजूनच चिघळलं.. धनगर समजाकडून रस्ता रोको करत तीव्र आंदोलनाचा इशारा...
तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळे व सोशल मिडियावरील बदनामी मुळे अनिकेत वडितकें या १९ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली होती. या तथाकथित गोरक्षकांवर गुन्हा दाखल करून वाढीव कलम लावून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कोल्हार येथे नगर-मनमाड रस्त्यावर दिपक बोऱ्हाडे, यशवंत सेनेचे विजय तमनर यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी विजय बोऱ्हाडे आणि दिपक तमनर यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आणि तीव्र संताप व्यक्त केलाय.