मंगळवेढा: लवंगी येथे माझ्या कुटुंबियांना त्रास देतोस म्हणत सख्ख्या भावाची भावाला काठीने मारहाण, मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे किराणा सामान घेऊन घरी परतणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या सख्ख्या भावाने शिवीगाळ करत काठी व मुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पीडिताने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी दादाराव रामा बाबर (वय 65, रा. लवंगी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते किराणा दुकानातून गोडतेल घेऊन परतत असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक रामा बाबर यांनी घरासमोर येऊन त्यांना अडवले.