सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 12 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2026 या दरम्यान SAANS Campaign
99 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 15, 2025 देशातील एकूण बालमृत्यूंपैकी सरासरी 16.3 टक्के बालमृत्यू हे न्यूमोनियामुळे होतात. 5 वर्षाखालील बालकामध्ये न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे आणि सन २०२५ पर्यंत न्यूमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमागे ३ पेक्षा कमी करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे.गृहभेटी व स्क्रिनिंग: आशा कार्यकर्तींमार्फत ५ वर्षांखालील बालकांच्या गृहभेटी घेऊन न्यूमोनियाची लक्षणे आणि जोखमीचे घटक (उदा. कमी वजन/अकाली जन्मलेली बालके) असलेल्या बालकांचा शोध घेतला जाईल. संसर्गग्रस्त बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले जाणार आहे.