विक्रमगड: पालघर जिल्हा परिषद कार्यालयाच्या शौचालयात आढळली मद्याची रिकामी बाटली
पालघर जिल्हा परिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या शौचालयात मद्याची रिकामी बाटली आढळली. त्याचप्रमाणे इमारतीच्या मागील बाजूस दोन-तीन मद्याच्या बाटल्या पडल्याचे देखील निदर्शनास आले. जिल्हा परिषद कार्यालयात मद्याची बाटली कुठून आली, कोणी आणली, कोणासाठी आणली, कोणी मद्य प्राशन केले असे अनेक सवाल उपस्थित झाले असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.