घाटंजी: पारवा ते रामनगर रोडवर जयस्वाल पेट्रोल पंप जवळ रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वर पारवा पोलिसात गुन्हे दाखल
15 ऑक्टोबरला पारवा ते रामनगर रोडवर जयस्वाल पेट्रोल पंपाजवळ आरोपी अनिकेत शेंडे व आणखी तीन असे चौघेजण त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दोन ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आले असता आरोपींच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर ट्रॉली व दोन ब्रास रेती असा एकूण 13 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 16 ऑक्टोबरला पारवा पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.