यवतमाळ: शहरातील लोहारा येथे मोरारी बापू यांची रामकथा प्रवचन ऐकण्याकरिता गेलेल्या महिलेचे दागिने लंपास
यवतमाळ शहरात मोरारी बापू यांची रामकथा प्रवचन ऐकण्याकरिता गेलेल्या श्रीमती ज्योत्स्ना भालचंद्र पांडे यांच्या छोट्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याच्या गोप व ओमचे लॉकेट २२ ग्राम वजनाचे किंमत 1 लाख 50 हजाराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने हातचलाखीने चोरून नेल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली आहे. सदर प्रकरणी 15 सप्टेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.