आमगाव: आमगाव शहरातील पेट्रोल पंप जवळ भरधाव बुलेटच्या धडकेत दोघे जखमी
Amgaon, Gondia | Oct 31, 2025 भरधाव वेगात असलेल्या बुलेटने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार दोघे जखमी झाल्याची घटना आमगाव शहरातील पेट्रोल पंपजवळ गुरुवारी (दि.३०) दुपारी ३:३५ वाजता दरम्यान घडली.कृष्णा युवराज खोटेले (३५, रा. बनगाव) हा तरुण आपल्या वडिलांसोबत मोटारसायकलने आंबेडकर चौकातून बनगावकडे जात असताना, गुप्ता बर्तन भंडार समोरील पेट्रोल पंपजवळ पिवळ्या रंगाच्या बुलेट चालकाने आपले वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कृष