गोरेगाव: नवरात्रीचे औचित्य साधून मातामाय देवस्थान सेवा येथे सभा मंडप बांधकामाचे भूमीपूजन
नवरात्रीचे औचित्य साधून माता माय देवस्थान जवळ माजी सरपंच गीता चुनीलाल ठाकूर यांचे हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार विजयज रहांगडाले यांच्या स्थानिक निधीतून मातामाय देवस्थान जवळ सभामंडप अंदाजे किं.7 लक्ष कामाचे भूमिपूजन पार पडले. प्रसंगी गावातील प्रथम नागरिक रचना रमेश ठाकूर, उपसरपंच विनोद पारधी ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्र ठाकूर, संजय कटरे, ग्रामपंचायत सदस्या रामबत्ता रहांगडाले, भूमेश्वरी पटले, अनिता ठाकरे डीलेश्वरी रंहागडाले पोलीस पाटील टिकाराम रंहागडाले आदी उपस्थित होते.