शिरूर: वाजेवाडीत आढळला अनोळखीचा मृतदेह
Shirur, Pune | Nov 29, 2025 वाजेवाडी (ता. शिरूर) येथील कावेरी हॉटेलजवळ एका बेशुद्धावस्थेतील व्यक्तीला ग्रामस्थांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मृत झाल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.मृताची ओळख पटलेली नसून साधारण ४० वर्षे वयाच्या या मृताच्या तोंडाला थोडे खरचटल्याचे आढळल्याने त्याबाबत अधिक सखोल तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.