समुद्रपूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आढावा :विविध विषयांवर केले मार्गदर्शन
समुद्रपूर:स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना संदर्भात तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड, प्रकल्प संचालक रसाळ,गटविकास अधिकारी सतिश टिचकूले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अभियानाच्या प्रत्येक बाबीचा सखोल आढावा घेऊन मार्गदर्शन केले.