नांदुरा: शहरातील मोठ्या हनुमान मूर्ती जवळील परिसरात महिलेची सोन्याची पोत चोरट्याने पळवली
अज्ञात चोरट्यांनी ३१ ऑक्टोबर दुपारी ३.३० वाजता शहरातील खडसे प्लॉट परिसरात एका महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची शॉर्ट पोत किंमत ६८ हजार रुपये हिसकावून पोबारा केला. घटनेची बळी संध्या वसंत वडे (५८) या हनुमानमूर्तीचे दर्शन घेऊन परत जात असताना मलकापूरकडे जाणाऱ्या मोटारसायकलवर बसलेल्या तीन अज्ञात व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने पोत हिसकावून नेली. संध्या वडे यांनी तत्काळ नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भारतीय दंडसंहितेचे कलम ३०४ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदविला.