नागपूर ग्रामीण: नजिकच्या गावात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार, बैलवाडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
बैलवाडा जवळ असलेल्या सावर मेंढा या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार झाले. भीमराव केने यांचे हे वासरू होते. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सावरमेंढा चे सरपंच अमोल केणे व बैलवाड्याचे सरपंच निकिता शेटे यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याची आव्हान केले आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील जपून शेतात जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे