दारू आणि तत्सम अमली पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी छत्तीसगडमधील युवकावर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेखराम नेमसिंग साहू (वय ३५, रा.निळे गल्ली आळंदी, मूळचा छत्तीसगड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना आळंदीतील वहिले गल्लीमध्ये मंगळवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.