जळगाव रेल्वे स्टेशन बाहेरून बस स्टँडकडे रिक्षाने प्रवास करत असताना दोन अज्ञात महिला चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोती हातचलाखीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण ९८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. या प्रकरणी शनिवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.