आज शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी धर्माबाद नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना धर्माबाद शहरातील एका मंगल कार्यालयात मतदारांना पैशाचे आमिष दाखवून बोलावण्यात आले असल्याचे तसेच त्यांना तिथेच डांबून ठेवल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात झाला असता आज दुपारी धर्माबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले की,मतदारांना डांबुन ठेवल्याची अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नाही तक्रार दाखल केल्यास कायदेशीर कार्यवाही करणार असे भडीकर म्हणाले.