धुळे: काँग्रेसला मोठा धक्का; साक्री रोड भागात माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्ते आमदार गावित यांच्या उपस्थितीत शिंदे गटात दाखल
Dhule, Dhule | Oct 19, 2025 आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. साक्री रोडवरील शितल कॉलनीत झालेल्या या कार्यक्रमानंतर साक्रीच्या पश्चिम पट्ट्यात काँग्रेसचे खिंडार पडले असून शिंदे सेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे.