कन्नड: कन्नड आगाराच्या प्रवासादरम्यान महिलेनं पळसवाडीजवळ चालत्या बसमधून घेतली उडी, जागीच ठार
गल्लेबोरगाव परिसरात बुधवारी (दि.२९ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली.मृतकाचे नाव – कांताबाई योगेश मरमट (वय ४०, रा. देहाडे नगर, हर्सूल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) असे असून त्यांनी चालत्या एसटी बसमधून उडी घेतल्याने जागीच मृत्यू झाला.कन्नड आगाराची एसटी (क्र. एमएच १४ बीटी ३०३८) सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गल्लेबोरगाव येथून निघाल्यानंतर पळसवाडी परिसरात पोहोचली असता ही घटना घडली.महिलेने कोणालाही काही न सांगता अचानक बसच्या दरवाज्याकडे जाऊन उडी मारली.