नशिराबाद गावातील मुक्तेश्वर नगरात मुलगा व मुलीने पळून जावून लग्न केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात शिवीगाळ व हाणामारी झाल्याची घटना रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याबाबत सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता परस्परविरोधात दोन्ही गटातील एकुण ११ जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.