नाशिकरोड परिसरात दोन अनोळखी इसमांनी 66 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची 65 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हरी संस्कृती अपार्टमेंट, खर्जुल मळा रोडवर ही घटना घडली. अॅक्टीवा मोटारसायकलवरून घरी जात असलेल्या फिर्यादीला मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी बोलण्यात गुंतवून लक्ष विचलित केले आणि हातातील अंगठी काढून पळ काढला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस तपास सुरू आहे.