संस्कृती मंच, जालनातर्फे आयोजित 18 वी दिवाळी पहाट सुरांच्या सुमधुर लहरींनी उजळून निघाली. शनिवार दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुप्रसिद्ध युवा गायक राजयोग धुरी यांच्या मंत्रमुग्ध करणार्या गायनाने या दिवाळी पहाटेचा सुरेल आरंभ झाला. राजयोग धुरी यांनी राग अहिर भैरवमधील अलबेला सजन आयो रे या बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि क्षणातच सभागृहात भावमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर माझे माहेर पंढरी, वृंदावनी वेणू, हे सुरांनो चंद्र व्हा असे गीत गायले.