मौदा: ग्रामपंचायत बोरगाव येथे दवाखाना आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन
Mauda, Nagpur | Oct 8, 2025 ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायत बोरगाव येथे दवाखाना आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की आरोग्य सेवेचा लाभ गोरगरिबांना मिळावा, मोफत उपचार मिळावे,याकरिता दवाखाना आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊन महिला पुरुषांची मोफत तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी यांनी नागरिकांना मार्गदर्शन करून मोफत औषधोपचार करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.