खुलताबाद शहरालगत असलेल्या शेकडो वर्षे जुन्या धरम तलावाच्या सुशोभीकरणातून नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी तलावातील साचलेले पाणी बाहेर काढल्याने ‘घरम तलाव फुटला’ अशी अफवा पसरली होती; मात्र ही केवळ पूर्वतयारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या ५४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून बनी बेगम बाग विकास प्रकल्प राबविला जात असून त्याचाच भाग म्हणून तलावाचे सौंदर्याकरण सुरू आहे. तलावातील गाळ काढणे, पाळीची भिंत उंच करणे आणि जलसाठा क्षमता वाढविण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत