ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची संतप्त प्रतिक्रिया : मनोज जरांगे यांच्या पोकळ धमक्यांवर टीका
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 6, 2025
आज दिनांक 6 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर तीव्र शब्दात टीका करताना म्हटले की 1994 चा जीआर हा मागासवर्गीय आयोगाने वैध ठरवलेला आहे, तो कोणीही रद्द करू शकत नाही मनोज जरांगे, त्यांचा बाप, आजोबा किंवा राष्ट्रपती-पंतप्रधान जरी झाले तरी. त्यांनी पुढे आरोप केला की जरांगे वारंवार गॅलेक्सी हॉस्पिटलमध्येच दाखल होतात, त्यामागे संशयास्पद कारण आहे. “एका दिवसाचा वीस ते पंचवीस हजारांचा खर्च कोण देतो?असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला