बाभूळगाव: गणोरी येथे डोक्यात दगड घालून एकाची निर्घृण हत्या
एका 45 वर्षीय इसमाची निर्गुण हत्या केल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथे 17 ऑक्टोबरला उघडकीस आली. रामदास माकोडे असे मृतकाचे नाव आहे.रामदास माकोडे यांच्या डोक्यावर दगड घालून हत्या केल्यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. गावातील बहुतांश लोकांनी घराचे दरवाजे बंद केले होते. बाभूळगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि आरोपी भारत यास ताब्यात घेतले.