शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा जोमानं फडकला ! मूल शहरात झालेल्या भव्य जनसंपर्क कार्यालय उद्घाटन आणि पक्ष प्रवेश सोहळ्याने संपूर्ण परिसरात नव्या ऊर्जेचा संचार झाला. या सोहळ्याला युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे, जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर, तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष गती लाभली. पाहुण्यांच्या हस्ते कार्यालयाचं विधिवत उद्घाटन करण्यात आलं.