कळमनूरी: आ.बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दत्ता बोंढारे तर उपसभापती पदी संजय भुरके यांची एकमताने निवड
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात आज दि .15 सप्टेंबर रोजी सभापती व उपसभापती पदासाठी निवडीची प्रक्रिया निर्वाचन अधिकारी अक्षय गुठ्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यामध्ये सभापती पदी दता बोंढारे तर उपसभापती पदी संजय भुरके यांची एकमताने निवड झाली आहे .त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे .