विजयदुर्ग येथे आरोग्य विभागाचा अभिनव पुढाकार — घरोघरी जाऊन आयुष्यमान, वयवंदना व आभा कार्ड सेवा*
*या उपक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर , जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी , गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांची भेट*
196 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 12, 2025 मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने, विजयदुर्ग येथे आरोग्य विभाग व ग्राम पंचायत टीमने घरोघरी जाऊन आयुष्यमान भारत कार्ड, वयवंदना योजना आणि आभा (ABHA) हेल्थ आयडी कार्ड नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली. या उपक्रमात आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांनी प्रत्येक घराला भेट देऊन संबंधित लाभार्थ्यांची माहिती घेतली, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कार्ड तयार केली.