फिर्यादी अर्चना इरपाते यांच्या तक्रारीनुसार सात डिसेंबरला फिर्यादीचे पती विष्णू इरपाते हे लोहारा ऑटो पॉईंट वर ऑटोमध्ये प्रवासी भरत असताना आरोपी गजानन डोईजड याने प्रवासी भरण्याच्या कारणावरून फिर्यादीच्या पतीसोबत वाद केला व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.याप्रकरणी सात डिसेंबरला यवतमाळ शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.