बार्शी: वडील-मुलीवर अपघाताचे सावट; भरधाव पिकअपने उध्वस्त केला प्रवास; वाटंबरे उड्डाणपुलावरील अपघात
Barshi, Solapur | Sep 27, 2025 सांगोला-पंढरपूर मार्गावरील वाटंबरे येथील उड्डाणपुलावर एका भरधाव टाटा पिकअप वाहनाने समोरून जाणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने वडील आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पिकअपचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. झापाचीवाडी येथील रहिवासी संजय यशवंत आलदर आणि त्यांची मुलगी साक्षी संजय आलदर हे दोघे त्यांच्या मोटरसायकलवरून सांगोल्याकडे जात होते. त्यावेळी हा अपघात घडला आहे.