कारंजा तालुक्यातील धनज खुर्द ते नागझरी दरम्यान इनोव्हा कार आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाडी चा दिनांक 18 ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला. या मध्ये एम एच 12 NE 4283 हे प्रवासी वाहतूक करणारे वाहन आणि एम एच 46 AD 2121 ही इनोव्हा कार धडकली या अपघातामध्ये ४ ते ५ लोकं गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . गाडी मध्ये अडकलेल्या जखमींना धनज पोलीस स्टेशन ठाणेदार भारत लंसंते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काढून उपचारासाठी अमरावती येथे पाठविले आहे