धुळे तालुक्यातील ‘आवादा’ सौर ऊर्जा कंपनीने भूमाफिया आणि काही अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीने आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर बळकावल्याचा आरोप एकलव्य संघटनेने करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. जमिनीचा ताबा परत द्यावा किंवा योग्य मोबदला द्यावा, प्रकल्प थांबवून दोषींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सौ. मयुरी सोनवणे यांनी दिला.