बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व उमेदवार धनेश असणारे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेमुळे बुधवारी नियोजित प्रचार शुभारंभ त्यांनी स्थगित केला. यावेळी दत्ता वाडकर व अन्य नेतेमंडळींसह ग्रामस्थांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.