गडचिरोली: धानोरा तालुका परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा - आमदार डॉ. देवराव होळी
मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पुरामुळे धानोरा तालुक्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चातगाव, कटेझरी, कोडकवाही सिंगापूर येथील नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी करताना केली.आज धानोरा तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी प्रत्यक्ष शेतावर बांधावर जाऊन केली.