जागतिक एड्स दिन: जनजागृती, सहानुभूती आणि प्रतिबंधाचा संकल्प दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जगभर जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. एड्स (AIDS - Acquired Immuno Deficiency Syndrome) या रोगाबद्दल आणि त्याला कारणीभूत असलेल्या एचआयव्ही (HIV - Human Immunodeficiency Virus) या विषाणूबद्दल व प्रसारबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, बाधित व्यक्तींना आधार व सन्मान देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. एड्स हा एचआयव्ही विषाणूमुळे होणारा रोग आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immune System) हळूहळू कमकुवत होते.