जालना महापालिका शाळांमध्ये कार्यरत सर्व शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महापालिकेमार्फत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावावी आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढावी या उद्देशाने हे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त आशिमा मित्तल या बोलत होत्या.