अंबड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत 1086 मतदारांच्या वाढीबाबत संशय व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने तहसील कार्यालयास निवेदन दिले आहे. या निवेदनात मतदार वाढीचा सविस्तर खुलासा करण्यात यावा, अन्यथा निवडणुका रद्द ठराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजीच्या मतदार यादीनुसार अंबड नगर परिषदेच्या हद्दीतील मतदार संख्या 27,962 इतकी होती. त्यानंतर 1 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीनुसार ही