आगामी कुंभमेळ्याच्या तयारीत गोदावरी आणि उपनद्यांची स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले. स्वच्छतेसाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी नाशिकमधील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या बैठकीत केले. बैठकीत प्लास्टिकमुक्ती, नदी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि स्वच्छता उपक्रम अधिक प्रभावी करण्याबाबत विविध प्रतिनिधींनी सूचना मांडल्या.