अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील येवला नाका जवळ रात्री च्या सुमारास घडली.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील येवला नाका परिसरात एक जण अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच जखमीला खासगी रुग्णवाहिका चालकाने तत्काळ वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री 10 वाजेच्या सुमारास दाखल केले.तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी व्यक्तीस तपासून मृत घोषित केले.प्रदीप बाजीराव मोईन वय 40 वर्षे राहणार बालाजीनगर जालना असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे.