कराड: कराड शहराला ठेकेदारांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी नगरपालिका निवडणूक निर्णायक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
Karad, Satara | Nov 27, 2025 कराड शहराला गेली अनेक वर्षे ठेकेदारांचा विळखा पडला आहे. शहरवासीयांना या विळख्यातून मुक्त करण्यासाठी नगरपालिका निवडणूक निर्णायक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता सभा घेतली. काँग्रेस पक्षाने पहिल्यांदाच कराड नगरपालिकेत काँग्रेसचे चिन्ह असलेल्या हाताच्या पंजावर उमेदवार उभे केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.