बुलढाणा: महायुतीचे सरकार मतचोरीच्या माध्यमातून अवकाळी सरकार आले - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
अवकाळीपणाचा प्रभाव महाराष्ट्रातील राजकीय ,सामाजिक आर्थिक जीवनावर पडत आहे. मुळात महायुतीचे सरकार हे संविधानाची पायमल्ली करून पक्षफोडीतून आलेले सरकार व आताचे सरकार हे मताची चोरी करून अवकाळी सरकार आलेलं आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.