पाथर्डी: पाथर्डीत जुन्या बसस्थानकासमोरील "तो" खड्डा बनला धोकादायक... शिवाई बसचे चाक रुतल्याने खोळंबा..!!
पाथर्डी शहरातल्या जुना बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतून जाणाऱ्या कटारीवर दोन मोठाले खड्डे पडले असून या खड्ड्यात दुचाकी आणि चारचाकीचे चाक जाऊन अनेकदा अपघात होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभाग हे खड्डे नेमके कधी बुजवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे खड्डे तात्काळीन बुजवून टाकावेत अशी मागणी प्रवासी करत आहेत. शहराच्या अगदी मध्यभागी जुने बसस्थानक असून या बसस्थानकाचे नुतनीकरण करण्याचा प्रारंभ भाजप-सेना युतीच्या काळात तत्क